लातूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात लातूर शहराला विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लातूर @२०४७’या संकल्पनेच्या माध्यमातून सादरीकरण कार्यक्रमाकरिता दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी तसेच विवेकानंद संस्कार संस्था, लातूर अध्यक्ष अँड. संजयजी पांडे, समन्वयक यशवंत अणदूरकर, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, कार्यवाहक प्रदीप ननंदकर यांनी केले आहे.
यासाठी मंगळवार दि.12 मार्च, 2024 रोजी प्रस्तावित आराखड्याच्या सादरीकरणाकरिता मा. श्री. सुधाकरजी श्रृंगारे, लोकसभा सदस्य, लातूर, मा. श्री. अमितजी देशमुख,अमदार, लातूर शहर तथा माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, मा. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, लातूर, मा. श्री. सोमय मुंडे (जिल्हा पोलिस अधिक्षक, लातूर), मा. श्री. बाबासाहेब मनोहरे, (मा. आयुक्त, लातूर शहर महानगरपालिका, लातूर) यांच्या प्रमुख उपस्थित प्रस्तावित ‘लातूर @२०४७’ मध्ये कसे असेल यासाठी लातूर शहरातील उपरोक्त तज्ज्ञांच्या समितीतून प्रस्तावित आदर्श आराखडा करण्यात आला आहे. यासाठी दिनांक 12/3/2024 रोजी दुपारी ठिक 04.30 वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातीलची सुरक्षा, व्यापार (मार्केट यार्ड), व्यापार, उद्योग, शिक्षण,आरोग्य पर्यावरण, स्वच्छता, पाणी, महिला, सांस्कृतिक व जेष्ठ नागरिक या १२ विषयांचे सादरीकरण होणार आहे.
लातूर वैभवशाली होण्यासाठी लातूरकरांच्या लेखी सूचना स्विकारल्या जाणार आहेत. लातूरचा भविष्यकाळ उज्वल व्हावा! यासाठी जागृत लातूरकरांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती मंगळवार दि. 12.03.2024 रोजी दुपारी 04.30 वा. नोंदवावी व विधायक सूचना कळवाव्यात असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी, विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष अँड. संजय पांडे, यांनी केले आहे.