Latur@2047 https://www.latur2047.com www.latur2047.com Thu, 14 Mar 2024 04:11:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.latur2047.com/wp-content/uploads/2024/03/cropped-16X9_02-1-32x32.jpg Latur@2047 https://www.latur2047.com 32 32 लातूरचे लातूरपण जपत लोकसहभागातून लातूरची प्रगती होईल – आमदार अमित देशमुख | लातूर @२०४७ साठी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण कार्यक्रम https://www.latur2047.com/2024/03/14/presentation-program-of-proposed-plan-for-latur2047/ https://www.latur2047.com/2024/03/14/presentation-program-of-proposed-plan-for-latur2047/#respond Thu, 14 Mar 2024 03:58:55 +0000 https://www.latur2047.com/?p=207 लातूरचे लातूरपण जपत लोकसहभागातून लातूरची प्रगती होईल – आमदार अमित देशमुख
लातूर @२०४७ साठी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण कार्यक्रम
लातूर : दयानंद शिक्षण संस्था,लातूर व विवेकानंद संस्कार संस्था,लातूर या दोन्ही संस्थांनी २०४७ पर्यंत लातूर कसे असेल या अनुषंगाने लातूरच्या विकासासाठी प्रस्तावित आराखडा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन दि.12 मार्च 2024 रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आलेले होते. राबवलेली चळवळ व प्रस्तावित आराखडा हा शासन, प्रशासनासाठी अत्यंत उपयोगी आहे. या आराखड्याच्या माध्यमातून व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, पाणी, वाहतूक, रस्ते, कायदा व सुव्यवस्था, महिला, ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविधांगी  क्षेत्रातील प्रश्नांचा आढावा घेऊन पाच-पाच वर्षाच्या टप्प्यातून विकासाला गती दिली पाहिजे. लातूरचे संस्कृती, वैभव व लातूरचा वारसा समृद्ध असा आहे. लातूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु येणाऱ्या काळात अनेक आव्हानांनाही लातूरकरांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे लातूरकरांच्या सूचनांचाही विचार करण्यात यावा. ब्रिटिश राजवट व निजाम राजवटीचा इतिहासही लक्षात घ्यावा. आज जिल्हा रुग्णालय,वैद्यकीय शिक्षण, बेकायदेशीर होर्डिंग्ज, वाहतुकीची कोंडी, फुटपाथवरील अतिक्रमणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणा, आग लागण्याचे प्रकार, पिण्याच्या पाण्याचा, पर्यावरणाचा, कचऱ्याचा प्रश्न, मनुष्यबळ, गुटखा व मटक्याचा प्रश्न, आम्ली पदार्थ, तरुण पिढीची मानसिकता अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची सोडवणूक आपणाला करावी लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणेत राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप नसतो. परंतु लातूरच्या शांततेसाठी काही वेळेस हस्तक्षेप करावा लागतो. म्हणूनच लातूरकरांच्या सूचना व लातूरचे लातूरपण जपत लोकसहभागातून लातूरचा विकास, प्रगती होईल,असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी या प्रसंगी केले.
या लातूर 2047याप्रसंगी प्रशिक्षित जिल्हाधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अजय देवरे,पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे,दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय पांडे,दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी,प्रदीप नणंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूर शहरातील विविध क्षेत्रातील १५ तज्ज्ञ व्यक्तींनी लातूर शहराच्या विकास कामाचा प्रस्तावित आराखडा सादर केला. या सादरकर्त्यांत अरुण समुद्रे यांनी वाहतूक रस्ते, जगन्नाथ चिताडे यांनी कायदा व सुव्यवस्था, ललितभाई शहा यांनी व्यापार(मार्केट यार्ड),विशाल अग्रवाल यांनी व्यापार, रतन बिदादा यांनी उद्योग, प्रकाश कासट यांनी औद्योगिक वसाहत,रमेश बियाणी यांनी शिक्षण, डॉ. चिंते डी.एन. यांनी आरोग्य, सुपर्ण जगताप यांनी पर्यावरण,दिपक चाबुकस्वार यांनी स्वच्छता,अशोक गोविंदपुरकर यांनी पाणी,शरयू कारंजे यांनी महिला,डॉ.संदीपान जगदाळे यांनी सांस्कृतिक, देविकुमार पाठक यांनी ज्येष्ठ नागरिक व डॉ.नितेश स्वामी यांनी क्रीडा या विषयावर प्रस्तावित आराखडा सादर केला.संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी लातूर हा दक्षिण भारताचा कोटा व शैक्षणिक हब झाले पाहिजे,असे सांगितले तसेच प्रशिक्षित जिल्हाधिकारी नमन गोयल,पोलीस अधीक्षक अजय देवरे व पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे या सर्वांनी स्वच्छ,सुंदर,सुसंस्कृत,सुरक्षित, आनंदी,आरोग्यदायी,पर्यावरणपूरक आणि सामाजिक सलोख्याचे लातूर घडविण्यासाठी या दोन्ही संस्थेच्याप्रमाणे प्रत्येक लातूरकरांनी भूत,वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून लातूरच्या सर्वांगीण विकासात हिरीरीने सहभाग नोंदवावा,असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद संस्कार संस्था,लातूर चे अध्यक्ष ॲड.संजय पांडे यांनी केले. तर आभार प्रदीप नणंदकर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक यशवंत अणदूरकर,दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम पवार, दयानंद फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुनम नाथानी, दयानंद इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस आणि दयानंद वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती पटवारी यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच लातूर व इतर सर्व प्राचार्यांचेही सहकार्य लाभले.याप्रसंगी लातूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक,जेष्ठ कार्यकर्ते,विविधांगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती,विवेकानंद संस्कार संस्थेचे पदाधिकारी आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील उपप्राचार्य,पर्यवेक्षक, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

]]>
https://www.latur2047.com/2024/03/14/presentation-program-of-proposed-plan-for-latur2047/feed/ 0
‘लातूर @२०४७’ साठी प्रस्तावित आराखडा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन https://www.latur2047.com/2024/03/13/organized-proposed-plan-presentation-program-for-latur-2047/ https://www.latur2047.com/2024/03/13/organized-proposed-plan-presentation-program-for-latur-2047/#respond Wed, 13 Mar 2024 06:36:59 +0000 https://www.latur2047.com/?p=23 लातूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात लातूर शहराला विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लातूर @२०४७’या संकल्पनेच्या माध्यमातून सादरीकरण कार्यक्रमाकरिता दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी  तसेच विवेकानंद संस्कार संस्था, लातूर अध्यक्ष अँड. संजयजी पांडे, समन्वयक यशवंत अणदूरकर, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, कार्यवाहक प्रदीप ननंदकर यांनी केले आहे.
यासाठी मंगळवार दि.12 मार्च, 2024 रोजी प्रस्तावित आराखड्याच्या सादरीकरणाकरिता मा. श्री. सुधाकरजी श्रृंगारे, लोकसभा सदस्य, लातूर, मा. श्री. अमितजी देशमुख,अमदार, लातूर शहर तथा माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, मा. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे(भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, लातूर, मा. श्री. सोमय मुंडे (जिल्हा पोलिस अधिक्षक, लातूर), मा. श्री. बाबासाहेब मनोहरे, (मा. आयुक्त, लातूर शहर महानगरपालिका, लातूर) यांच्या प्रमुख उपस्थित प्रस्तावित ‘लातूर @२०४७’ मध्ये कसे असेल यासाठी लातूर शहरातील उपरोक्त तज्ज्ञांच्या समितीतून प्रस्तावित आदर्श आराखडा करण्यात आला आहे. यासाठी दिनांक 12/3/2024 रोजी दुपारी ठिक 04.30 वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातीलची सुरक्षा, व्यापार (मार्केट यार्ड), व्यापार, उद्योग, शिक्षण,आरोग्य पर्यावरण, स्वच्छता, पाणी, महिला, सांस्कृतिक व जेष्ठ नागरिक या १२ विषयांचे सादरीकरण होणार आहे.
लातूर वैभवशाली होण्यासाठी लातूरकरांच्या लेखी सूचना स्विकारल्या जाणार आहेत. लातूरचा भविष्यकाळ उज्वल व्हावा! यासाठी जागृत लातूरकरांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती मंगळवार दि. 12.03.2024 रोजी दुपारी 04.30 वा. नोंदवावी व विधायक सूचना कळवाव्यात असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी, विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष अँड. संजय पांडे, यांनी  केले आहे.

]]>
https://www.latur2047.com/2024/03/13/organized-proposed-plan-presentation-program-for-latur-2047/feed/ 0